जुन्नरला रोप आपल्या दारी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दत्ता म्हसकर
रविवार, 8 जुलै 2018

गेल्या दहा दिवसांत एकूण 46 हजार रुपये किमतीची 5 हजार 762 रोपांची विक्री झाली असल्याचे वनपाल कृष्णा दिघे यांनी सांगितले.

जुन्नर - जुन्नर वनपरिक्षेत्राचे वतीने एक जुलै पासून सुरू करण्यात आलेली रोपे आपली दारी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शनिवारी ता. 9 ला 25 हजार 680 रुपये किंमतीची रोपे विकली गेल्याने विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे.

गेल्या दहा दिवसांत एकूण 46 हजार रुपये किमतीची 5 हजार 762 रोपांची विक्री झाली असल्याचे वनपाल कृष्णा दिघे यांनी सांगितले. शिवनेरी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौकात वनविभागाची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात वड, पिंपळ, बेहडा, बांबू, जांभूळ, सीताफळ, आवळा, चिंच, उंबर, खैर, कांचन, रेन ट्री आदी विविध प्रजातीची रोपे माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध करन देण्यात आली आहेत. प्लॅस्टिक पिशवीतील लहान रोप आठ रुपये तर मोठे 40 रुपये असा दर ठेवण्यात आला असून लहान रोपांना नागरिकांकडून पसंती मिळत असल्याचे दिघे यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Peoples spontaneous response to rop aaplya daari venture of Junnar