कोथरुडमध्ये महिला टक्का घसरणार?

पुणे महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोथरुड क्षेत्रिय कार्यालयातील महिला प्रतिनिधींची संख्या कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Summary

पुणे महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोथरुड क्षेत्रिय कार्यालयातील महिला प्रतिनिधींची संख्या कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोथरुड - पुणे महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोथरुड क्षेत्रिय कार्यालयातील महिला प्रतिनिधींची संख्या कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत कोथरुड क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सहा महिला व सहा पुरुष नगरसेवक होते. नव्या रचनेत ५ महिला व सात पुरुष प्रतिनिधी असतील. पुरुष नगरसेवकांची संख्या महिलांपेक्षा दोनने जास्त असणार आहे.

प्रभाग ३२ मध्ये २ महिला नगरसेविका निवडून येतील. त्यामुळे पुरुषाच्या जागेसाठी चुरस असेल. एकमेकाचा पत्ता कट करण्यासाठी काय राजकारण खेळले जाईल व त्यामध्ये कोण जिंकेल याबद्दल कोथरुडकरांना उत्सुकता आहे.

अनुसुचित जाती जमातीसाठी कोणतेही आरक्षण नसताना आरपीआयला जागा देण्याचा उदारपणा दाखवत भाजपा बेरजेचे राजकारण खेळणार का? यंदाही जागा मिळाली नाही म्हणून इतर उमेदवारांना पाठींबा देण्याचा निर्णय आरपीआयचे कार्यकर्ते घेतील का? भाजपाची मनसे बरोबर युती झाल्यास कोथरुड मधील कोणती जागा मिळेल, शिवसेना कोणत्या जागा लढवेल, काँग्रेसचे संख्याबळ वाढणार की घटणार, महाविकास आघाडी एकत्र लढली तर त्यांचे वाटप कसे असेल या प्रश्नांवर कोथरुडमध्ये सध्या चर्चा रंगल्या आहेत.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयात मोडणा-या प्रभागातील आरक्षण असे आहे.

प्रभाग क्र. 30 -

जय भवानी नगर - केळेवाडी

  • अ -सर्वसाधारण महिला

  • ब -सर्वसाधारण

  • क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. 31 -

कोथरूड गावठाण - शिवतीर्थनगर

  • अ -सर्वसाधारण महिला

  • ब -सर्वसाधारण

  • क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. 32 -

भुसारी कॉलनी - बावधन खुर्द

  • अ -सर्वसाधारण महिला

  • ब -सर्वसाधारण महिला

  • क -सर्वसाधारण

प्रभाग क्र. 33 -

आयडियल कॉलनी - महात्मा सोसायटी

  • अ -सर्वसाधारण महिला

  • ब -सर्वसाधारण

  • क -सर्वसाधारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com