स्पर्धा परीक्षेसाठी परिपूर्ण पुस्तके

Sakal-Publications
Sakal-Publications

पुणे - प्रशासकीय सेवेतील अधिकारी पदांसाठी होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन करणारी सकाळ संयुक्त (Combined) PSI - STI - ASO आणि सकाळ करंट अपडेट्‌स (व्हॉल्यूम १) ही दोन संदर्भ पुस्तके ‘सकाळ प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात आली आहेत. ही परीक्षार्थींच्या यशासाठी उपयुक्त ठरणारी आहेत.

सकाळ संयुक्त पीएसआय-एसटीआय-एएसओ हे पुस्तक पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी आणि संबंधित स्पर्धा परीक्षांसाठीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. अभ्यासक्रमातील सर्व विषय आणि सराव प्रश्‍न आणि उत्तरांचा समावेश असलेल्या या पुस्तकात तज्ज्ञ लेखकांचे योगदान आहे. शारीरिक चाचणी या विषयाचे मार्गदर्शन हे या पुस्तकाचे आणखी एक विशेष आहे. 

सकाळ करंट अपडेट्‌स (व्हॉल्यूम १) हे त्रैमासिक आगामी काळात होणाऱ्या राज्य सेवा, दुय्यम सेवा संयुक्त व  गट क सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. यात जानेवारी आणि फेब्रुवारी-२०२० या कालावधीतील महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, पर्यावरण, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घटना-घडामोडींची पायाभूत आणि त्यांचे परिणाम स्पष्ट करणारी विश्‍लेषणात्मक माहिती आहे.

केंद्र व राज्याचा अर्थसंकल्प, तसेच आर्थिक पाहणी अहवाल, कोरोना विषाणूचे जगभरातील थैमान, नमस्ते ट्रम्प कार्यक्रम, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, दिल्ली व झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल, पद्म आणि ऑस्कर पुरस्कार या आणि इतर विशेष चर्चेतील बातम्यांचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमधील पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीनही टप्प्यांवर दोन्ही संदर्भ पुस्तके उपयुक्त ठरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com