आळेफाटा पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
संशयीत आरोपींना अटक केली
संशयीत आरोपींना अटक केलीSakal

आळेफाटा - पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या एका हाॅटेलजवळ बिबट्याची कातडी तस्करी करण्यासाठी आलेल्या तिघाजणांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आळेफाटा( ता. जुन्नर) येथील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की पुणे व नाशिक महामार्गावरील आळेफाटा हद्दीतील हाॅटेल फाऊंटन समोर एका गाडीमध्ये बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाची नेमणूक करुन सापळा रचण्यात आला.

यावेळी त्या ठिकाणी ऊभी असलेली पांढऱ्या रंगाची मारुती ८०० गाडी क्रमांक एम एच १५ ए एच ७९६३ यामध्ये तिन इसम संशयीत संशयीत रित्या आढळून आले त्या ठिकाणी छापा टाकला असता त्यामध्ये बिबट्या सद्रुष कातडी आढळून आली त्यांना याबाबत त्यांच्याकडे बिबट्या सद्रुष कातडी बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले या प्रकरणी साजिद सुलतान मनियार ( वय ३२) रा देवठाण ता अकोले जि अहमदनगर ,शरद मोहन मधे ( वय ३२ रा वय ३२ वर्ष रा शेरनखेल ता अकोले जि अहमदनगर, रामनाथ येशू पथवे वय ४९ रा शेरनखेल ता अकोले जि अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक डाॅ अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलिस हवलदार चंद्रा डूंबरे विनोद गायकवाड लहानु बांगर भिमा लोंढे पोपट कोकाटे पोलिस काॅन्स्टेबल अमित माळुंजे मोहन आनंदगावकर हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने केली पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार विनोद गायकवाड करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com