Loksabha 2019 : संसदेतील उपस्थिती अन् चर्चेत महाराष्ट्रातील खासदारांची कामगिरी सरस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

पुणे :  संसदेतील पाच वर्षातील खासदारांची उपस्थिती, विचारलेले प्रश्न, चर्चांमध्ये सहभाग, मांडलेले विधायक आणि खासदार निधीचा वापर यामध्ये देशभरातील एकुण खासदारांच्या तुलनेत महाराष्ट्रातील खासदारांची कामगिरी सरस असल्याचे  परिवर्तन संस्थेने केलेल्या विश्लेषणातून समोर आले आहे.

पुणे :  संसदेतील पाच वर्षातील खासदारांची उपस्थिती, विचारलेले प्रश्न, चर्चांमध्ये सहभाग, मांडलेले विधायक आणि खासदार निधीचा वापर यामध्ये देशभरातील एकुण खासदारांच्या तुलनेत महाराष्ट्रातील खासदारांची कामगिरी सरस असल्याचे  परिवर्तन संस्थेने केलेल्या विश्लेषणातून समोर आले आहे.

परिवर्तन संस्थेच्या वतीने देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील ५७१ खासदारांचे पाच वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. लोकसभेतील खासदारांची उपस्थिती, लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांची संख्या, चर्चेत सहभाग, खासदारांनी लोकसभेत स्वतंत्रपणे मांडलेल्या विधेयकांची संख्या आणि खासदार निधीचा वापर या पाच निकषावरून हा रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. प्रकल्प प्रमुख अंकिता अभ्यंकर, सदस्य दीपक बाबर, सायली दोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  

२३ फेब्रुवारी ते २३ मार्च या एका महिन्यात लोकसभा व एमपीलॅडस् या संकेतस्थळावरून ही माहिती संकलित केली आहे. या माहितीचे विश्लेषण khasdar.Info या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. परिवर्तन संस्थेने या आकडेवारीवरून कोणताही निष्कर्ष काढलेला नाही, नागरिकांनी स्वतः ही माहिती बघावी, विचार करावा आणि त्यावरून स्वतःचे मत तयार करणे अपेक्षित आहे.

''खासदारांना दिलेली आयुधे त्यांनी किती वापरली व मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे'', असे प्रकल्प प्रमुख अंकिता अभ्यंकर यांनी सांगितले. ''महाराष्ट्रातील खासदारांनी तुलनात्मक चांगले काम केले आहे हे दिसून येते'',  असे दोडके यांनी सांगितले.  

 

मुद्दा                                             राष्ट्रीय सरासरी         महाराष्ट्राची सरासरी 

लोकसभेतील उपस्थित                         ६६.६%                          ६९ %
विचारलेले प्रश्न                                     २५०                         ५३३
चर्चेत सहभाग                                       ६४                            ६८
मांडलेली विधेयक                                    २                             ४
खासदार निधीचा वापर(कोटीमध्ये)            १८                            १६

Web Title: The performance of MP's of Maharashtra in attendance and discussion in Parliament in Good