पीकविमा योजनेची मुदत 24 जुलैपर्यंत

पीकविमा योजनेची मुदत 24 जुलैपर्यंत

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात "प्रधानमंत्री पीक विमा योजना' सर्व जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत असल्याची माहिती कृषी आयुक्‍तालयाच्या वतीने देण्यात आली आहे. 

या योजनेत सहभागी होण्यासाठी बॅंक आणि "आपले सरकार सेवा केंद्र' यांच्यामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. सेवा केंद्रांवर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज न भरता आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा संरक्षण मिळण्यासाठी मुदतीपूर्वी विमा प्रस्ताव सादर करावेत. योजनेत सहभाग घेण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. 

पुण्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, परभणी, कोल्हापूर, सांगली, नगर, वाशीम, बुलडाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, ठाणे, रायगड, नाशिक, गडचिरोली, पालघर, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऍग्रीकल्चर इन्श्‍यूरन्स कंपनी ऑफ इंडिया, मुंबई या विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा टोल फ्री क्रमांक 1800116515 आणि दूरध्वनी क्रमांक 022- 61710901 असा आहे; तर जालना, हिंगोली आणि नागपूर जिल्ह्यासाठी पुण्याच्या येरवडा येथील बजाज अलियांझ जनरल इन्श्‍यूरन्स कंपनीमार्फत विमा योजना राबविण्यात येणार आहे. त्यांचा टोल फ्री क्रमांक 18002095959 आणि दूरध्वनी क्रमांक 020- 66240137 असा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com