चंद्रशेखर आझादांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जुना बाजार रोड येथे सभा होणार होती मात्र पुणे पोलिसांनी परवानगी दिली नाही. 

पुणे : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जुना बाजार रोड येथे सभा होणार होती मात्र पुणे पोलिसांनी परवानगी दिली नाही. 

भीम आर्मी या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे रविवारी (ता. 30) रात्री पुण्यात दाखल झाले. आझाद यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रविवारी पोलिसांनी सुटका केल्यानंतर ते पुण्याला आले. सध्या सागर प्लाझा हॉटेलमध्ये असून हॉटेलबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, चंद्रशेखर आझाद आज (ता.21) दुपारी एक वाजता पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आणि सभा घेण्यासाठी आझाद पुण्याला येणार होते. तत्पूर्वी मुंबईमध्ये शुक्रवारी त्यांची सभा होणार होती. आझाद मुंबई येथे दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले होते. दरम्यान, शनिवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आझाद यांच्या होणाऱ्या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट नकार दिला होता, तर रविवारी एसएसपीएमएस मैदानावर त्यांची सभा होणार होती. मात्र, संबंधित मैदान आझाद यांना सभेसाठी उपलब्ध होणार नसल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना परवानगी देण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे सांगितले. 

दरम्यान, रविवारी मुंबई पोलिसांनी आझाद यांची मुक्तता केल्यानंतर त्यांनी पुण्याला येण्याचे ठरविले. त्यानुसार रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुण्यात आल्यानंतर ते एसएसपीएमएस मैदानावर आले. त्यानंतर पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गेले. त्यानंतर रात्री सागर प्लाझा हॉटेलमध्ये मुक्काम केला.

Web Title: The permission for Chandrasekhar Azad's Pune meeting was denied