राष्ट्रवादीच्या पंधरा 'क्‍लिप'ला परवानगी नाकारली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीच्या धामधुमीला सुरवात झाल्याने राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचार माध्यमांवर महापालिकेच्या निवडणूक विभागाने आता नजर रोखली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या "ऑडिओ', "व्हिडिओ' स्वरूपातील "क्‍लिप'मधील चित्रण, मजकूर तपासूनच परवानगी देण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सादर केलेल्या 21 पैकी 15 "क्‍लिप'ला परवानगी नाकारली आहे.
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांतून करण्यात येणाऱ्या प्रचारावर निवडणूक आयोगाने काही निर्बंध लादले आहेत. त्यानुसार प्रचाराचे स्वरूप, मजकूर आणि चित्रण तपासूनच परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता स्वतंत्र समिती नेमली आहे. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांसह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तीत समावेश आहे. निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याने सोशल मीडियावरील प्रचाराचा मजकूर तपासण्याची कार्यवाही सुरू केली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने परवानगीसाठी 21 "क्‍लिप' दिल्या होत्या. त्यापैकी 15 क्‍लिपला परवानगी देता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या संदर्भात पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी निवडणूक कार्यालयाकडे तक्रार केली आहे.

Web Title: Permission denied for 15 NCP clip