राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाची चिकाटी शिकण्यासारखी : शरद पवार

sharad_pawar.jpg
sharad_pawar.jpg

पिंपरी : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जो पर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत, पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही चिकाटी आपणही शिकली पाहिजे,'' असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपाला मिळणाऱ्या यशामागील गुपित एका भाजप खासदारानेच सांगितल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

भोसरी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, "आपला देश सर्वसमावेशक आहे. तरीही धर्माच्या नावावर मते मागितली जातात. देशाची निवडणूक सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवी वस्त्रे घालून दिवसभर गुहेत बसतात. जग कुठे निघालेय, विज्ञान काय सांगते आणि तुम्ही नव्या पिढीसमोर काय आदर्श ठेवताय. देशात ही कसली प्रवृत्ती वाढली आहे.'' 

पवार म्हणाले, "भाजप सरकारला गरीब, दलित, वंचित यांच्याविषयी अजिबात आस्था नाही. राज्यांमधील नेमके प्रश्‍न माहित नाहीत. महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ आहे. त्यात राजकारण आणू नका. जनावरांना जगवा. माणसांबरोबरच जनावरांसाठीही पाण्याचे टॅंकर पुरवा. उद्या याबाबत सरकारबरोबर दुसरी बैठक होत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने, मोठे औद्योगिक कारखाने, कंपन्या यांनी आपला वाटा म्हणून टॅंकर आणि चारा छावणीची जबाबदारी घ्यावी.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com