पुणे : 1100 किमीचा प्रवास सायकलवरून अवघ्या 55 तासांत पूर्ण (व्हिडिओ)

पुणे : 1100 किमीचा प्रवास सायकलवरून अवघ्या 55 तासांत पूर्ण (व्हिडिओ)

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिरुपती बालाजी ते बारामती असे तब्बल 1100 किमीचे अंतर अवघ्या 55 तासांत पूर्ण करुन बारामतीचे 'आयर्नमॅन' सतीश ननवरे यांनी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी आज संध्याकाळी सतीश ननवरे यांचे बारामतीतील भिगवण चौकात उत्स्फूर्त स्वागत केले. 

आरोग्य सुदृढ राहावे, सायकलचा वापर दैनंदिन जीवनात अधिकाधिक व्हावा, या उद्देशाने निरोगी जीवनासाठी सायकलचा वापर वाढविण्याचा संदेश देण्यासाठी सतीश ननवरे यांनी हा टप्पा पार केला.  

शरद पवार यांना दीर्घायू लाभावे, या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सायकलचा संदेश समाजात रुढ व्हावा यासाठी हा उपक्रम केल्याचे ननवरे यांनी सांगितले. 

10 डिसेंबर रोजी पहाटे तिरुपतीहून ते सायकलने निघाले. दोन दिवसात 1100 किमीचा टप्पा सायकलवरुन पूर्ण करत ते आज बारामतीत पोहोचल्यानंतर बारामतीकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. 

सतीश ननवरे यांनी या पूर्वी ऑस्ट्रियातील क्लॅनफर्ट येथे, स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे तसेच ऑस्ट्रेलियातील बसलटन येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यश संपादन केले आहे. पुणे बारामती, कोल्हापूर बारामती, अष्टविनायक दर्शन हेही त्यांनी सायकलवरुन पूर्ण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com