एटीएम भरणाऱ्यानेच केले साडेबारा लाख लंपास

एटीएम भरणाऱ्यानेच केले साडेबारा लाख लंपास

पुणे : एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेतून 12 लाख 37 हजार रुपयांची रोकड लंपास केला. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संदीप केतकर (वय 40, रा. एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सुमीत राजपूत (वय 25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठीची जबाबदारी एका खासगी कंपनीवर सोपविली आहे. त्यानुसार, राजपूत हा त्याच्यासमवेतच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्याकडे दिलेली रक्कम वेगवेगळ्या एटीएममध्ये भरण्याचे काम करत होता. एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी राजपूतकडे 52 लाख रुपयांची रोकड देण्यात आली होती. खराडी येथील कंपनीच्या कार्यालयामध्ये गाडीत रक्कम भरल्यानंतर राजपूत, अन्य कर्मचारी व सुरक्षारक्षक विविध ठिकाणी गेले. 52 लाखांपैकी 29 लाख 12 हजार रुपये त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या बॅंकांच्या एटीएममध्ये भरले आणि साडेदहा लाख रुपये कंपनीकडे परत केले. तर उर्वरित 12 लाख 37 हजार रुपयेही राजपूत याने कंपनीकडे देणे बंधनकारक असतानाही, त्याने ही रक्कम लंपास केली.

दरम्यान, एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेतून परत आलेली रक्कम कमी असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक एस. पी. भोसले करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com