बाणेर बालेवाडी येथील शाळांमध्ये वैयक्तिक स्वच्छता अभियान

बाबा तारे
बुधवार, 11 एप्रिल 2018

औंध : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने बाणेर बालेवाडी डॉक्टर्स असोसिएशनच्या (बीएमए) वतीने मुलींसाठी  वैयक्तिक स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले आहे. याची सुरूवात बालेवाडी येथिल श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या म्हा. तु. बालवडकर शाळेतून करण्यात आली.

याप्रसंगी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींना बीएमएच्या वतीने  सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींनी मासिक पाळीच्या दरम्यान स्वतःची कशाप्रकारे काळजी घ्यावी, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरीक स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज कशा प्रकारे महत्वाची आहे, याची माहिती डॉ. प्रिया देशपांडे यांनी मुलींना समजावून सांगितली.

मुलींसाठी सुरू करण्यात आलेले हे वैयक्तिक स्वच्छता अभियान सातत्याने सुरु ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या वतीने रूपाली बालवडकर, सागर बालवडकर उपस्थित होते.

बाणेर बालेवाडी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. राजेश देशपांडे, डॉ. साळवे , डॉ. कविता चौधरी , डॉ. सायली सोनखेडकर, डॉ. सागर सुपेकर , डॉ. सुषमा जाधव व डॉ. सुवर्णा साळवे उपस्थित होते.

Web Title: Personal Health campaign in Schools in Baner Balewadi