पेशवे जलाशयाच्या प्रवेशद्वारात संभाजी महाराजांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

कात्रज - नानासाहेब पेशवे जलाशयाच्या प्रवेशद्वारात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांपाठोपाठ संभाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा नागरिकांना मिळावी, या उद्देशाने प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कदम यांनी हा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. जयंतीचे औचित्य साधून या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.  आमदार योगेश टिळेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, नगरसेवक वसंत मोरे, प्रकाश कदम, राहुल पोकळे, सुरेश कदम, नमेश बाबर, दीपक गुजर, विकास फाटे, राहुल जाधव, राजाभाऊ कदम आदी उपस्थित होते.

पर्यटकांचे आकर्षण
जलाशयातील कृत्रिम बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, विठ्ठलाची भव्य मूर्ती आणि सव्वादोनशे फूट उंचावर फडकणारा तिरंगा इत्यादींमुळे हा जलाशय पर्यटकांना आकर्षित करीत आहे. शिवशंभू प्रतिष्ठानने जलाशयाच्या प्रवेशद्वारात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. यामुळे परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

Web Title: peshave Reservoir entrance sambhaji maharaj statue