पुण्यात पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी महागले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये व्हॅट आकारण्याचा निर्णय घेतल्याने रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. पुण्यात आज पेट्रोल 78.09 रुपये प्रति लिटर तर डिझेल 66.99 रुपये प्रति लिटर झाले आहे. 

पुणे : राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर दोन रुपये व्हॅट आकारण्याचा निर्णय घेतल्याने रविवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. पुण्यात आज पेट्रोल 78.09 रुपये प्रति लिटर तर डिझेल 66.99 रुपये प्रति लिटर झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटवर सरसकट दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. काल पुण्यात पेट्रोलचा दर 76.02 रुपये, तर डिझेलचा दर  64. 98 रुपये प्रति लिटर होता. त्यात दोन रुपयांची भर पडल्याने वाहनचालकांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडला आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाची मागणी कमी झाली होती, मात्र गेल्या आठवडाभरात इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा वाढले आहेत. त्यातच राज्य सरकारने व्हॅट वाढविण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
------
कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी; कोणाला टाकले मागे?
------
आंदोलन चिघळले; ट्रम्प व्हाईट हाऊसमल्या संरक्षण बंकरमध्ये हलविले
------
सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आहे, मात्र कोरोना आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने व्हॅटचे वाढवलेले दर कमी करावेत, अशी मागणी ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी केली आहे.

पुण्यातील आजचे दर

  • पेट्रोल : 78.09
  • डिझेल : 66.99
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol and diesel became more expensive In Pune