esakal | सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Price Hits Record High After Rates Hiked For 16th Day In A Row

लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे इंधनाची दरवाढ अद्याप सुरूच आहे. सलग १६ दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत.

सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे इंधनाची दरवाढ अद्याप सुरूच आहे. सलग १६ दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत. १ जूनपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने वाहनचालकांचे बजेट कोलमडून गेले आहे. सोमवारी पुणे शहरात पेट्रोलचा दर पेट्रोल ८६.०६ तर डिझेलचे दर ७५.७९ रुपये इतके झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लॉकडाऊनमुळे पुण्यातील व्यवहार सुरळीत होत असताना रस्त्यावरील वाहतूक वाढत आहे. सर्वसाधारणपणे पुण्यात रोज ३० लाख लिटर पेट्रोलची विक्री होते, पण संचारबंदीच्या काळात पुण्यातील अनेक रस्ते, बाजारपेठ, कार्यालय बंद असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता तुरळक वाहतूक  सुरू होती. त्यामुळे ही विक्री फक्त ३ लाख लिटरवर आली होती. या काळात सलग ४६ दिवस पेट्रोलचे दर ७६. ०७ रुपये आणि -डिझेलचे दर ६४.९७ पेशावर स्थिर होते. पण लॉकडाऊनमुळे वाहनचालकांना स्थिर दरांचा लाभ मिळाला नव्हता.
--------
अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी
--------
लॉकडाऊनमधून बाहेर पडून सर्वच व्यवहार सुरळीत होत आहेत. सर्व प्रकारचे दुकाने उघडली आहेत, तर कमी मनुष्यबळावर खासगी कार्यालये सुरू झाली आहेत, मात्र याच काळात इंधन वाढीचा फटका पुणेकरांना बसला आहे. अडीच महिन्यापेक्षा जास्त काळ घरात बसून असलेला कामगार वर्ग, मजूरांची रोजीरोटी पुन्हा सुरू होत आहे. असे असताना इंधन दरवाढीमुळे खिशाला चांगलाच दणका बसत आहे. १ जून पासून कधी ४० पैसे, कधी ५० पैसे, तर कधी २० पैसे असे पेट्रोल डिझेलचे दर वाढत गेले, पण ही वाढ पैशांमध्ये असल्याने त्यांची तीव्रता दिसून आली नाही. मात्र थोडे थोडे करून गेल्या १६ दिवसात पेट्रोल आणि डिझेले दोन्हीही जवळपास १० रुपयांनी महाग झाले आहे. यामध्ये आणखी एक रुपयांपर्यंत वाढ होईल असेही सांगितले जात असल्याने मध्यमवर्गीयांना चांगलाच फठका बसणार आहे.

स्थिर रहाणार पण कमी नाही होणार
आंतरराष्ट्रीय स्थिती पाहता पुढील एका आठवड्यात दर न वाढता स्थीर होतील असे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन कडून सांगितले जात आहे. पण, हे वाढलेले दर कमी कधी होणार? सर्वसामान्य लोकांना दिलासा कधी मिळणार हे मात्र निश्चित सांगता येत नसल्याने नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. 

७ जून 
पेट्रोल 78.67
डिझेल 67.55

८ जून
पेट्रोल 79.25
डिझेल 68.11

९ जून
पेट्रोल 79.77
डिझेल 68.65

१० जून
पेट्रोल 80.15
डिझेल 69.07

११ जून 
पेट्रोल 80.73
डिझेल 69.62

१२ जून
पेट्रोल 81.27
डिझेल 70.17

१३ जून
पेट्रोल 81.84
डिझेल 70.71

१४ जून
पेट्रोल 82.43
डिझेल 71.31

१५ जून
पेट्रोल 82.89
डिझेल 71.86

१६ जून
पेट्रोल 83.34
डिझेल 72.39

१७ जून 
पेट्रोल 83.87
डिझेल 72.94

१८ जून
पेट्रोल 84.38
डिझेल 73.54

१९ जून
पेट्रोल 84.92
डिझेल 74.13

२० जून
पेट्रोल 84.92
डिझेल 74.13

२१ जून 
पेट्रोल 85.74
डिझेल 75.25

२२ जून 
पेट्रोल 86.06
डिझेल 75.79

loading image