पुणे : किरकोळ भांडणात एकाचा डोक्यात दगड घालून खून

Crime
Crime

पुणे : दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणात दोन महिलासह पाच जणांनी मिळून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. ही घटना खडकी परिसरात बुधवारी(ता.13) रात्रीच्या सुमारास घडली. 

गोपाळ अर्जुन कांबळे ( वय 29, रा. बंगला नंबर 23, खडकी बाजार) असे खुन झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. याप्रकरणी राजेश राजू स्वामी, सागर अशोक उंबरकर,धीरज गवली, रेणूका परदेशी आणि राधा स्वामी असे संशयित आरोपीची नावे असून त्यापैकी रेणुका परदेशी व राधा स्वामी यांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील जुना बाजार परिसरात लष्करी अधिकाऱ्याचा जुना बंगला आहे. या बंगला परिसरात सर्वजण बुधवारी रात्री दारू पित होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली. त्यानंतर त्यांनी कांबळे याचा खुन केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com