Pune : औषधनिर्माणशास्राच्या प्रवेश अर्जांना मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pharmacology

Pune : औषधनिर्माणशास्राच्या प्रवेश अर्जांना मुदतवाढ

पुणे : औषधनिर्माणशास्रातील पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, उमेदवार आता १२ नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करू शकता. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने यासंबंधीचे अद्ययावत वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक पूर्णतः कोलमडले असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीलाही उशीर झाला आहे. आता प्रत्यक्ष प्रवेश फेऱ्यांना सुरवात तर झाली आहे, मात्र दिवाळी सुट्यांचा विचार न केल्यामुळे उमेदवारांची अडचण होत असल्याची तक्रार संस्थाचालकांनी केली होती. त्याचीच दखल सीईटी सेलने घेतल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना पुरेशी संधी मिळावी म्हणून २८ ऑगस्टची मुदत वाढवून आता १२ नोव्हेंबर करण्यात आली आहे. पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीबरोबरच आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांना या तारखेपर्यंत अपलोड करायची आहे. फेसीलेशन सेंटरमध्ये जात ही कागदपत्रे पडताळूनही घ्यायची आहे. जर तसे झाली नाही तर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अर्ज आपोआप रद्द करण्यात येईल, असे प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.

महत्त्वाच्या तारखा...

- ऑनलाईन अर्ज भरणे आणि पडताळणे - १२ नोव्हेंबर

- तात्पुरती गुणवत्ता यादी - १४ नोव्हेंबर

- हरकती आणि सूचना - १७ नोव्हेंबर

- अंतिम गुणवत्ता यादी - १९ नोव्हेंबर

संकेतस्थळ - https://cetcell.mahacet.org/