दत्तकला संस्थेस मुलींसाठीच्या फार्मसी महाविदयालयास मान्यता

प्रशांत चवरे
रविवार, 10 जून 2018

भिगवण : स्वामी चिंचोली (ता.इंदापुर) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक वर्षे २०१८-१९ पासुन दत्तकला इन्स्टीट्युट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अॅंड रिसर्च फॉर गर्लस् या डी. फार्मसी व बी. फार्मसी या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व सचिव माया झोळ यांनी दिली आहे.

भिगवण : स्वामी चिंचोली (ता.इंदापुर) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक वर्षे २०१८-१९ पासुन दत्तकला इन्स्टीट्युट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अॅंड रिसर्च फॉर गर्लस् या डी. फार्मसी व बी. फार्मसी या अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व सचिव माया झोळ यांनी दिली आहे.

स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये यापुर्वी दत्तकला औषधनिर्माण महाविदयालय(बी.फार्मसी) व अनुसया औधषनिर्माण महाविदयालय(डी. फार्मसी) हे अभ्यासक्रम सुरु होते. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचा विशेषतः मुलींचा या अभ्यासक्रमांकडे मोठा ओढा होता. ग्रामीण भागातील पालकांची मागणी विचारात घेऊन दत्तकला शिक्षण संस्थेने फार्मसी कौंन्सिल ऑफ इंडियाकडे अर्ज केला होता. कौंन्सिलने दत्तकला शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलास भेट देऊन संस्थेमध्ये असलेल्या भौतिक सुविधा, प्रयोगशाळा, शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. उपलब्ध करुन दिलेल्या सुविधाबद्दल समाधान व्यक्त करुन संस्थेस शैक्षणिक वर्षे २०१८-१९ पासुन दत्तकला इन्स्टीट्युट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अॅंड रिसर्च फॉर गर्लस् या डी. फार्मसी व बी. फार्मसी या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आल्याचे पत्र संस्थेस दिले आहे. बी. फार्मसीसाठी प्रथम वर्षासाठी १२० विदयार्थ्यांना तर डी. फार्मसीसाठी प्रथम वर्षासाठीच्या ६० विदयार्थ्याच्या प्रवेशास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागांमध्ये केवळ मुलींसाठी असलेले हे पहिलेच महाविदयालय असल्यामुळे मुलींना त्याचा मोठा फायदा होणार आहे.  

 याबाबत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, औषधनिर्माण अभ्यासक्रमांकडे ग्रामीण भागातील विदयार्थ्यांचा ओढा वाढला आहे. विशेषतः या क्षेत्राकडे मुलींनी मोठा रस दाखविला आहे. त्यामुळे पालकांच्या मागणीनुसार मुलींसाठी स्वतंत्र बी. फार्मसी व डी. फार्मसी अभ्यासक्रम सुरु करण्याचा विचार केला. त्यानुसार फार्मसी कौंन्सिल ऑफ इंडियाकडे अर्ज केला होता. संस्थेने अभ्यासक्रमासाठी आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधांची पुर्तता केली. कौन्सिलने शैक्षणिक संकुलाची पाहणी करुन दत्तकला इन्स्टीट्युट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अॅंड रिसर्च या डी. फार्मसी व बी. फार्मसी या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींना मोठी संधी उपलब्ध झाल्याचे समाधान आहे. 
 

Web Title: pharmacy college for girls approved for dattkala orgamasation