पीएचडीसाठी लागणार आता तीन वर्षे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पुणे - विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडी आणि एमफिलच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार पीएचडी अभ्यासक्रमाचा किमान अवधी तीन वर्षे करण्यात आला आहे. एमफिल अभ्यासक्रमाची कमाल मर्यादा दोन वर्षे करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या नियमांची अंमलबजावणी कशी करायची, यासाठी समिती स्थापन केली आहे. आयोगाच्या नियमानुसार डिसेंबरअखेरपर्यंत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार आहेत. त्यानंतर पीएचडीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या नियमानुसार एमफिल करीत असलेल्या विद्यार्थ्याच्या शोधनिबंधाचे मूल्यांकन झाले असेल; परंतु त्याची मौखिक परीक्षा राहिली असेल, तरी त्याला पीएचडी अभ्यासक्रमासाठी त्याच विद्यापीठ वा संस्थेत प्रवेश घेता येणार आहे. पीएचडीची कमाल कालमर्यादा सहा वर्षे आहे. महिलांसाठी या कालावधीतून कमाल दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे. या काळात महिलांना एकदा 240 दिवसांची मातृत्व रजादेखील मिळणार आहे.

एमफिल किंवा पीएचडी पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला किमान 55 टक्के गुण किंवा 7 ग्रेड पॉइंट मिळविणे आवश्‍यक आहे. अशा प्रकाराचे काही बदल नियमांमध्ये करण्यात आले आहेत. त्याची सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

Web Title: p.hd. education for three years

टॅग्स