समाजासाठी दानशूरांनी पुढे यावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

‘समाजात आजही अनेक उपेक्षित घटक असून ते मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyarisakal
Summary

‘समाजात आजही अनेक उपेक्षित घटक असून ते मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत.

स्वारगेट - ‘समाजात आजही अनेक उपेक्षित घटक असून ते मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सुदृढ समाज निर्मितीसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे,’ असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

रविवार पेठ येथील श्री मुकुंद भवन ट्रस्टच्या सहा हजार चौरस फूट जागेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पार्क अकॅडमी-स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अभ्यासिका केंद्र सुरु करण्यात आले आहे. या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, विश्वस्त आदित्य लोहिया, शरद सारडा, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, ॲकॅडमीचे कार्यवाहक महेश पोहनेरकर, संचालक धनंजय काळे आदी उपस्थित होते.

दीक्षित म्हणाले, ‘मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यशस्वी सनदी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावे.’ लोहिया यांनी ट्रस्टच्यावतीने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पोहनेरकर यांनी प्रास्ताविकात विवेक व्यासपीठ समूहात वस्ती पातळीवरील युवकांचे व सामाजिक संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. राजकुमार चोरडिया, राजेश शहा, रामकुमार राठी, दीपक म्हैसेकर, अ‍ॅड. एस. के. जैन, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. शैलेश गुजर, सत्येंद्र राठी , गिरिधर काळे आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com