bharti-airtel
bharti-airtel

अजब कारभार! फोन बंद करूनही ‘भारती एअरटेल’ने पाठविले एवढे बिल

पुणे - लॉकडाउनमुळे पुढील काही महिने हॉटेल बंद राहणार आहे. त्यामुळे हॉटेलमधील २४ लँडलाइन फोन बंद करावेत, असा मेल ‘भारती एअरटेल लिमिटेड’ला पाठवला. त्याबाबत कंपनीकडून होकार कळविण्यात आला. मात्र त्यानंतरही आलेले फोनचे बिल पाहून धक्काच बसला. त्यामुळे कंपनीविरोधात मी स्थायी लोकअदालतील गेलो. तेथे एअरटेलने आपली चूक मान्य करीत बिल माफ केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा धक्कादायक अनुभव कथन करीत होते, हॉटेल व्यावसायिक बिनोद थडानी. त्यांचे विमाननगर परिसरात ‘स्टे एट होम’ नावाचे हॉटेल आहे. मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्याने त्यांचे हॉटेल बंद होते. त्यामुळे त्यांनी हॉटेलमधील भारती एअरटेलचे सर्व फोन कनेक्शन बंद करण्याचे ठरविले. त्याबाबत त्यांनी कंपनीला मेल पाठवून सर्व फोन कनेक्शन बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याबाबत कंपनीकडून होकार कळविण्यात आला. तरी देखील त्यांना एप्रिलचे ३३ हजार ९२७ आणि मे महिन्याचे ६३ हजार ८८६ रुपये बिल आले. तर अंतिम बिल ६६ हजार रुपयांचे होते. त्यामुळे थडानी यांना धक्काच बसला. 

फोन बंद करण्याची सूचना देऊनही बिल आल्याने थडानी यांनी स्थायी लोकअदालतीत धाव घेत ॲड. विजय राठोड यांच्यामार्फत अर्ज केला. फोन बिलाची रक्कम ६६ हजार रुपये कंपनीने मागू नये, असे त्यांच्या अर्जात नमूद होते. त्या अर्जाची नोटीस एअरटेलला मिळाली तेव्हा कंपनीने थडानी यांचे म्हणणे समजून घेत त्यावर प्रतिसाद दिला.

बिलासाठी तगादा
बिल पाठवून मानसिक त्रास दिल्याने थडानी यांनी सुरुवातीला एअरटेलशी संपर्क साधला. तुम्हाला बिलाची रक्कम भरावीच लागेल. अन्यथा आम्ही तुमच्याविरुद्ध दिल्ली येथील लवादात दावा दाखल करू. त्यासाठी तुम्हाला दिल्लीला यावे लागेल, असे त्या वेळी त्यांना सांगण्यात आल्याचे अर्जात नमूद होते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com