दूरध्वनी, एसएमएसद्वारे मतदानाचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

पुणे - ""हॅल्लो, मी... या उमेदवारांच्या कार्यालयातून बोलतेय. प्रभाग क्रमांक... मधून हे उमेदवार ... या पक्षाकडून उभे आहेत. त्यांना अधिकाधिक प्रमाणात मत द्या,'' असे आवाहन करणारा दूरध्वनी आणि एसएमएस सध्या हजारो मतदारांच्या मोबाईलवर येत आहेत. जवळपास सर्वच प्रभागातील उमेदवारांनी यासाठी खास वॉररूम तयार केली असून, तेथे पाच ते सहा जणांची टीम रोज प्रभागातील एक हजारांहून अधिक मतदारांना दूरध्वनी करून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. 

निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांकडून नवे फंडे आजमावले जात आहेत. त्यासाठी सोशल मीडिया हाताळणाऱ्या एजन्सीला उमेदवारांनी काम दिले आहे, तर प्रचारासाठीच्या वॉररूममध्ये दूरध्वनी आणि एसएमएस पाठविण्यासाठी खास टीम तयार केली आहे. जवळपास सर्वच उमेदवारांनी अशी खास टीम तयार केली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून प्रभागातील मतदारांच्या दूरध्वनी क्रमांकाची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना दूरध्वनी आणि एसएमएस पाठविला जात आहे. एसएमएस आणि दूरध्वनीद्वारे उमेदवारांची माहिती, त्यांच्या प्रचार सभा, रॅली याबाबतची माहिती दिली जाते. त्याशिवाय प्रत्येक मतदाराला पक्ष, उमेदवाराचे नाव, विकासकामांची माहिती आणि उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

याबाबत एका उमेदवाराच्या कार्यालयातील कर्मचारी म्हणाल्या, ""आम्ही दररोज एक हजाराहून अधिक मतदारांना दूरध्वनी करत आहोत. प्रचार रॅलीपासून ते प्रचार सभेची माहिती देत आहोत, तर वेगळी टीम एसएमएस पाठविण्यासाठी तयार केली आहे. त्यासाठी मतदारांच्या दूरध्वनीची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार आम्ही दूरध्वनी करत आहोत.'' 

मोफत एसएमएस सुविधा 
नमस्कार उद्या... या ठिकाणी माझी सभा आहे. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती. आपला लाडका उमेदवार... असा एसएमएस दररोज असंख्य मतदारांना मोबाईलवर येत आहे. दूरसंचार कंपन्यांकडून पुरविण्यात येणाऱ्या मोफत एसएमएस सुविधेचा वापर करून ते मतदारांना पाठविण्यात येतात. त्याचा फायदा उमेदवाराच्या प्रचारासाठी होत आहे.

Web Title: Phone, SMS voting appeal