धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलांनी केला छायाचित्रकाराचा खून

Photographer murdered by two minors Daund
Photographer murdered by two minors Daund

दौंड : दौंड शहरातील छायाचित्रकार केदार भागवत यांचा खून दोन अल्पवयीन मुलांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटीच्या उद्देशाने केल्याचे उघडकीस आले आहे. खून झाल्यानंतर तब्बल ७५ दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने व दौंड पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.

दौंड तालुक्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीपाद भागवत यांचे ज्येष्ठ चिरंजीव केदार भागवत ( वय ४६, रा. शालीमार चौक, दौंड) यांचा ४ ऑक्टोबर रोजी दौंड - लिंगाळी रस्त्यालगत काळे मळा येथील कालव्याजवळ डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या 'आधार'साठी शिक्षकांची धावाधाव; शाळा कधी सुरू होणार काय माहित?​

दौंड पोलिसांनी विविध शक्यता पडताळून खुनाचा तपास केला परंतु दोन महिन्यानंतरही कोणतेही धागेदोरे मिळाले नव्हते. दरम्यान ५ डिसेंबर रोजी दौंड - कुरकुंभ रस्त्यावर एका खासगी कंपनीतील विक्री अधिकारी असणारे संजय मिश्रीलाल मुनोत (रा. दौंड) यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन आरोपींना आणि लुटीचा माल घेणाऱ्या एका तरूणाला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यापैकी दोघांनी केदार भागवत यांचा खून केल्याचा उलगडा झाला. 

४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दौंड शहरातील जयहरी चौक ते शालीमार चौक दरम्यान दोन अल्पवयीन आरोपींनी केदार भागवत यांना लिफ्ट देऊ केली. दुचाकीवर गप्पा मारत बोरावकेनगर येथून तिघे काळे मळा येथील कालव्याजवळ आले. अंधारात दोघांनी पैशांची मागणी केली. परंतु भागवत यांच्या खिशात फक्त वीस रूपयेच मिळाल्याने दोघांनी बेदम मारहाण करण्यासह डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

Sakal Impact: अखेर शिंदे कुटुंबाला मिळाला न्याय; मंत्रालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत उडाली होती खळबळ​

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, दौंडचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, महिला फौजदार अमृता काटे, सहायक फौजदार दिलीप भाकरे, हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत, सचिन बोराडे, कॅान्स्टेबल नीलेश वाकळे,दगडू वीरकर, आदींनी गुन्हा उघडकीस आणला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com