छायाचित्रांसाठी ‘पोझ’, पोलिसांशी वादावादी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पुणे - कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुललेला शनिपार चौक...क्षणोक्षणी वाढणारी उत्कंठा...प्रत्येक क्षण सेल्फीत बंदिस्त करणारे कार्यकर्ते-उमेदवार अन्‌ अर्ज भरल्यानंतर बाहेर येऊन कार्यकर्त्यांना अभिवादन करणारे उमेदवार...अशा वातावरणात कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय शुक्रवारी पाहायला मिळाले.

‘तिकीट’ नाकारल्यामुळे काहींमध्ये नाराजी होती, तर अर्ज भरल्यानंतर छायाचित्रांसाठी ‘पोझ’ देणारे उमेदवारही येथे पाहता आले. गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांशी वादावादी करणारे कार्यकर्ते, उमेदवाराला शुभेच्छा देणारे नातेवाईक आणि महिलांच्या गर्दीने वेगळे वातावरण निर्माण झाले होते.

प्रभाग क्रमांक - १५ (शनिवार- सदाशिव पेठ), १७  (रास्ता-रविवार पेठ) आणि  २९ (नवी पेठ- पर्वती)  या प्रभागांसाठी येथे अर्ज भरले. सकाळपासून उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी रांग लागली होती. ‘एबी फॉर्म’ मिळाल्यावर अर्ज भरण्यासाठीची लगबग, ऐनवेळी कागदपत्रे कमी पडल्याने ‘झेरॉक्‍स’च्या दुकानात झालेली गर्दी, अशी सर्व कामे कार्यकर्ते नेटाने करत होते. खादी कुर्ता, पायजमा, जॅकेट, पक्षाचे चिन्ह आणि उपरणे असा खास पेहराव करून पुरुष उमेदवारांनी आणि रंगीबेरंगी साड्या आणि पक्षाचे चिन्ह-उपरणे अशा पेहरावात महिला उमेदवारांनी कार्यालयात प्रवेश केला.

कागदपत्रांची जुळवाजुळव आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत उमेदवारांनी अर्ज भरले. उमेदवारासोबत मोजक्‍याच कार्यकर्त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येत होता. अर्ज भरून बाहेर आल्यानंतर उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला. मनसेच्या उमेदवारांनी तर खास इंजिनची प्रतिकृती असलेल्या गाडीत जल्लोष साजरा केला. कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण? हे याबाबत पुरेशी माहिती मिळत नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते.

Web Title: Photographs for pose