रसिकांनी अनुभवली छायाचित्रांतून वारी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पुणे - पावसाची रिमझिम...टाळ-मृदंगाचा गजर...विठ्ठल-नामाचा जयघोष...भक्तीत तल्लीन झालेले वारकरी असा पालखीचा सोनेरी प्रवास पुणेकरांना ‘इंद्रायणी ते चंद्रभागा-२०१८’ या छायाचित्र प्रदर्शनातून पाहायला मिळाला.

सकाळ सोशल फाउंडेशन आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफीच्या वतीने ‘इंद्रायणी ते चंद्रभागा-चित्रप्रवास’ ही पालखी सोहळ्यावर आधारित छायाचित्र स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्यातील विजेत्या छायाचित्रकारांना मंगळवारी ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार आणि ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

भारती विद्यापीठाचे प्रा. मधुसूदन तावडे आणि राहुल पुसदेकर या वेळी उपस्थित होते. फाउंडेशनचे समन्वयक राहुल गरड यांनी सूत्रसंचालन केले. 

या स्पर्धेतील छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे तीनदिवसीय प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आले होते. शंभरहून अधिक छायाचित्रकारांची १५०० हून अधिक निवडक छायाचित्रे प्रदर्शनात रसिकांना पाहता आली. या स्पर्धेसाठी भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफीचे संचालक राजन चौगुले यांचे सहकार्य मिळाले. भारती विद्यापीठ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते व चेन्नई येथील श्रीष्टी डिजीलाइफ यांनी पारितोषिकांसाठी प्रायोजकत्व दिले होते.

स्पर्धेतील विजेते
 सर्वसाधारण विभाग - मुकुंद पारखे (प्रथम), श्रीधर पलंगे (द्वितीय) आणि नितीन पाटील (तृतीय)
 उत्तेजनार्थ - सुमीत चव्हाण, मंगेश मोरे आणि आनंद बोरा
 पोज्ड पोट्रेट फोटोग्राफी विभाग - ओंकार दामले (प्रथम), योगेश पोळ (द्वितीय) आणि मुकुंद पारखे (तृतीय)

वारकऱ्यांची असीम भक्ती, त्यांची ऊर्जा आणि त्यांचे वारीशी असलेले नाते हे कसे परिपक्व आहे, याची अनुभूती मी अनुभवली आहे. नवीन छायाचित्रकारांसह व्यावसायिक छायाचित्रकारांना स्पर्धेतून संधी मिळाली. दहा वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. वारीशी तरुणांना जोडणे हा स्पर्धेचा उद्देश होता. 
- मृणाल पवार, संचालिका, सकाळ

‘सकाळ’ने भरविलेल्या या छायाचित्र प्रदर्शनातून अनेक छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळाले आहे. वारीची एक वेगळीच अनुभूती यातून घेता आली. हा उपक्रम स्तुत्य असून, नवीन छायाचित्रकारांना यातून संधी मिळाल्याने आनंद वाटला. 
- प्रा. मधुसूदन तावडे, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी

Web Title: Photography Exhibition Award Distribution