फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेकडो कार्यकर्ते तसेच नागरिक व विद्यार्थी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत आहे.

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेकडो कार्यकर्ते तसेच नागरिक व विद्यार्थी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आज (ता. 20) विठ्ठल रामजी शिंदे पुलावर मान्यवर एकत्र आले होते. यावेळी विवेकाचा आवाज बुलंद करूया, फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील उपस्थित होत्या. "आपण अंहिसेचं व्रत घेतल आहे. ज्या माणासाने जनतेला चांगला विचार करण्याचे आवाहन केले, त्या माणसाचा खुण करण्याची गरज कोणाला वाटली असेल? कितीही निषेध केला आणि कितीही माणस पकडली तरी ही हाणी आयुष्यभर जाणवत राहणार आहे. या घटनेमुळे अंधश्रध्दा कमी झाली आहे का? आपल्या आसपास अशा घटना घडत असतात. त्यासाठी अंध्दश्रध्देचा आधार घेणे चुकीचे आहे. अंध्दश्रध्देच निर्मुलन झालेच पाहिजे.''  असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

तसेच साने गुरुजी स्मारक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ५ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी, अनिसचे उपाध्यक्ष अशोक हिवडे, डॉ. मेघा पानसरे आदि उपस्थित होते

यावेळी तुषार गांधी म्हणाले, ''जे मारेकरी आज पकडले आहेत त्यांना गेल्या पाच वर्षात का पकडले नाही ?  या खुणसत्राच्या सुत्रधारांपर्यंत तपासयंत्रणा पोहचणार नाही अशी व्यवस्था गेल्या पाच वर्षात निर्माण केली. त्यानंतर आता त्यांना पकड्यात आले. आता यानंतर कोर्टाच्या सुनावनी सुरु होतील आणि शेवटी ठोस पुराव्या अभावी त्यांची सुटका होईल.

तर मेघा पानसरे म्हणाल्या , '' अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविदनशील लोक गेले पाच वर्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्याची प्रतिक्षा करत आहे. गेली पाच वर्ष सराकारला 'जवाब दो' आंदोलन चालू आहे. यापुर्वी तपास यंत्रणा निष्क्रीय होत्या पण आता काही दिवसांमध्ये जो तपास झाला आहे त्यातून अनेक संशयितांची नावे समोर आले आहे. दाभोलकर, पाणसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्यांमध्ये संबध आहे. त्याचे धागेदोरे समोर येत आहे. जे सुत्रधार आहेत यामागील त्यांचे चेहरे देखील समोर यावेत.

Web Title: Phule-Shahu-Ambedkar, we are all Dabholkar