अभिवादनासाठी फुले वाडा गजबजला; छत्तीसगडचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

सकाळपासूनच नागरिकांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती
अभिवादनासाठी फुले वाडा गजबजला; छत्तीसगडचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

पुणे : महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गंज पेठेतील फुले वाड्यात अभिवादानाला नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. आज समता भूमीत महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून, याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पुरस्कारार्थी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहणार आहे.

सकाळपासूनच नागरिकांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. पुण्यातील सर्वच राजकीय, वैचारिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ, मनसेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक वसंत मोरे, माजी आमदार दीप्ती चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासनाने डॉ. सुनील भंडगे आदीनी अभिवादन केले. महात्मा फुले यांची आज १३१ वी पुण्यतिथी असून, पुण्यासह राज्यभरातील नागरिक अभिवादानासाठी येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com