चित्र म्हणजे जगण्याचे भान - अरणकल्ले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

पुणे - 'चित्र म्हणजे रेषांची दिशा, ठिपक्‍यांची भाषा, दृष्टीची नशा आणि जगण्याची आशा...चित्र म्हणजे जगण्याचे भान...चित्र हे चित्रच असते. चित्र हे मित्र असते. चित्र हे वेल्हाळ नक्षत्र असते. चित्र स्तिमित करणारे उद्‌गारचिन्ह असते आणि चित्र हे पूर्णविरामाच्याही पलीकडे नेणारे अर्थगर्भ वाक्‍य असते,'' अशा काव्यमय ओळींतून "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी चित्रकला आणि त्यातल्या सौंदर्याचे गमक उलगडले.

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी कलर पेन्सिलींनी चितारलेल्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन अरणकल्ले यांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी ते बोलत होते. अरणकल्ले म्हणाले, ""निसर्गात सगळीकडे सौंदर्य असते. खरेतर तुम्ही काय पाहता आणि काय टिपता, हे महत्त्वाचे असते. आजच्या काळात दुर्दैवाने हेच कमी होत चालले आहे. आपल्या आसपास खूप मोठा "कॅनव्हास' आहे. त्याच्याशी संवाद साधावयास हवा.''
परांजपे म्हणाले, ""संवाद होणे हे कलेतून अपेक्षित असते. अभिव्यक्ती ही कुठल्याही कलेतून होऊ शकते. कलेच्या कृत्रिम भिंती मात्र गळून पडल्या पाहिजेत. लोकप्रियतेच्या मागे लागून कलेच्या साधनेकडे दुर्लक्ष होऊ नये.''

प्रदर्शनात काय
हिरव्या रंगाच्या एकापेक्षा एक छटा, फुलांचे विविध आकार, गोठ्यातील जनावरे आणि त्यांचा वावर, असे खास ग्रामीण मातीतील सौंदर्य टिपणारी निसर्गचित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. ते 29 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत पाहता येईल.

Web Title: Pictures of living awareness