पिंपरगणेच्या युवकांच्या 'या' कामाचा सर्वांनीच आदर्श घ्यावा!

rai.jpg
rai.jpg

मंचर : डिंभे ते आहुपे या रस्त्यावर पिंपरगणे गावाच्या जवळ डोंगराच्या पायथ्याशी असलेला ७० ते १०० फुट लांबीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खाते व वनखात्याच्या लाल फितीच्या वादात अडकला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम थांबले आहे. मुसळधार पावसाने रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने  १० आदिवासी गावांची वाहतूक बंद पडण्याचा धोका निर्माण झाला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी (ता.१५) पिंपरगणे येथील आदिवासी तरुणांनी श्रमदान करून रस्त्यावर खडी पसरविली. त्यामुळे भरपावसातही वाहतूक सुरळीत राहणार आहे.

डिंभे धरण ते आहुपे रस्त्याचे नूतनीकरनाचे काम राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या  प्रयत्नाने सुरू होते. पिंपरगणे येथे वनविभागाने रस्त्याचा काही भाग त्यांच्या हद्दीत येत असल्याने काम थांबविले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामासाठी परवानगी घेतली नाही. असे वनविभागाचे म्हणणे आहे. पण जुनाच रस्ता आहे. फक्त अति उताराचे चढ काढायचे आहेत. असे म्हणणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव  वनविभाग नागपूरकडे मजुरीसाठी पाठवला आहे. या वादात तीन ते चार महिने गेले.असे भीमा गवारी यांनी सांगितले. गेली काही दिवस भीमाशंकर-आहुपे खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे.  सध्या पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली.वाहतूक बंद पडल्यास आदिवासी १० गावांचा  संपर्क तुटेल.म्हणून संदीप गवारी,कुशाबा पारधी,दिलीप भावरी,काशीनाथ गवारी,दीपक सातपुते,दिनेश गवारी,दत्ता वडेकर या तरुणांनी पुढाकार घेतला.रस्त्याच्या कडेला असलेली खडी टेम्पोमध्ये भरली.चार तासात रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली.त्यामुळे खड्डे भरले गेले. तरुणांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com