esakal | Pimple - Dhumal : प्रशासनाला ११ अधिकारी देणारे गाव!
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पिंपळे-धुमाळ : प्रशासनाला ११ अधिकारी देणारे गाव!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी म्हटली की, त्यात शिरूर तालुक्यातील पिंपळे-धुमाळ (खालसा, ता. शिरूर) हे गाव ओघाने आलेच. हेच यश पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये अधोरेखित झाले आहे. जेमतेम तीन हजार लोकसंख्येच्या या गावाने प्रतीक अशोकराव धुमाळ यांच्या रुपाने प्रशासनाला नुकताच अकरावा अधिकारी दिला आहे.

‘यूपीएससी’त १८३ व्या रॅंकने यशस्वी झालेल्या प्रतीक यांचा घरी जाऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी नुकताच सत्कार केला. प्रतीक यांची आई ललिता धुमाळ या मुख्याध्यापक असलेल्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील १३ विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत चकमकल्याचा विषय या वेळी चर्चेला आला. यशस्वी मुले पुढे काय करतात असा विषय निघताच २००९ मध्ये डीवायएसपी होऊन गावातून पहिले अधिकारी होणारे व सध्या मुंबईत सहायक पोलिस महानिरीक्षक असलेले रमेश धुमाळ यांचे नाव चर्चेत आले.

त्यानंतर पुढे अकरा जणांची प्रशासकीय यादी पुढे आली. दरम्यान, आतापर्यंत गावातील ४९० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले असून यंदा या यशवंताचे पाचवे शतक पूर्ण करण्याचा निर्धार मुख्याध्यापक ललिता धुमाळ यांनी बोलून दाखविला. आढळराव-पाटील यांनी प्रतीक व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार केला. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे व स्वप्नील धुमाळ उपस्थित होते.

loading image
go to top