फेरप्रस्तावानंतर पिंपरी 'स्मार्ट सिटी'त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

पिंपरी : 'केंद्र सरकारला 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी फेरप्रस्ताव सादर केल्यावर पिंपरी- चिंचवड शहराचा या प्रकल्पात निश्‍चितपणे समावेश होईल. 'स्मार्ट सिटी' विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक पायाभूत सुधारणा घडविण्यासाठी जनतेचाही कौल घेण्यात येईल,'' असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच 'पुणे मेट्रो' पिंपरी ते लोणावळा आणि चाकण ते हिंजवडी करण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. 

पुण्यात 'पुणे मेट्रो'च्या भूमिपूजनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी-चिंचवड महापालिकेला केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात समावेश करण्याची संधी दिली जाईल, असे केंद्रीय शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शनिवारी पुण्यात जाहीर केले. त्याबद्दल जगताप बोलत होते. खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एकनाथ पवार उपस्थित होते. 
जगताप म्हणाले, ''केंद्रातील भाजप सरकारकडे 'स्मार्ट सिटी' योजनेसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित प्रस्ताव पाठविला होता. दोन्ही शहरे वेगळी असताना एकत्रित प्रस्ताव पाठविण्यात आल्याने पिंपरी-चिंचवडला सोडून केवळ पुणे शहराचा 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात अंतर्भाव करण्यात आला. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने पुढे आपल्या प्रस्तावात सुधारणा केल्या. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रस्तावात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. पिंपरी-चिंचवडचा 'स्मार्ट सिटी'त समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे. पुणे पालिकेप्रमाणेच पिंपरी-चिंचवड पालिकेनेही आवश्‍यक त्या सुधारणा आपल्या प्रस्तावात कराव्यात.'' 

मार्चमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात 
'पुणे मेट्रो'बद्दल बोलताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ''मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात भूसंपादनाच्या फार अडचणी दिसत नाहीत. स्वारगेट ते पिंपरीपर्यंतच्या टप्प्याचे काम संपण्यापूर्वी किंवा त्या बरोबरीनेच निगडीपर्यंतचे काम पूर्ण केले जावे, अशी आमची भूमिका राहील. मार्च 2017 मध्ये मेट्रोच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणे अपेक्षित आहे.''

Web Title: Pimpri to be included in Smart City project, claims BJP