पिंपरी : व्हिडिओ क्लिपच्या आधारे महिलेला केले ब्लॅकमेल 

संदीप घिसे 
सोमवार, 14 जानेवारी 2019

पिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे घडली.

विश्वनाथ वाल्हे (रा. दर्शन नगरी, चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने अंबरनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन सदरचा गुन्हा रविवारी (ता. १३) चिंचवड पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. ही घटना उल्हासनगर-ठाणे आणि चिंचवड येथे २१ नोव्हेंबर ते ९ जानेवारी २०१९ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विश्वनाथ याने फिर्यादी महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक संबंधांची तिच्या नकळत व्हिडिओ क्लीप काढली. आरोपी आणि पीडित महिला यांच्यात झालेला संवाद पतीला दाखविण्याची धमकी दिली. तसेच एक लाख रूपये न दिल्यास शारीरिक संबंधाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. चिंचवड पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pimpri: Blackmail done to the woman on the basis of video clip