पिंपरी : सावत्र आईकडून मुलांना अमानुष मारहाण 

संदीप घिसे 
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पिंपरी (पुणे) - वडील आणि सावत्र आईने दोन मुलांना क्रूरपणे मारहाण केली. ही घटना 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान कासारवाडी येथे घडली. 

ज्ञानेश्‍वर पाटील (वय 38) आणि अश्‍विनी पाटील (वय 32, दोघेही रा. गोयल कॉम्प्लेक्‍स, नाशिकफाटा, कासारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. नूपुर पाटील (वय 10) आणि शिवम (वय साडेतीन वर्ष) अशी मारहाणीत जखमी झालेल्या बालकांची नावे आहेत. याबाबत त्यांचे आजोबा भिवसन दादाजी कापडणीस (वय 61, रा. मु.पो.दयाने, ता. सटाणा, जि. नाशिक) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सहायक निरीक्षक सुनील गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नूपुर आणि शिवम यांच्या आईचे निधन झाले आहे. यामुळे त्यांचा सांभाळ वडील ज्ञानेश्‍वर आणि सावत्र आई अश्‍विनी हे दोघेजण करीत आहेत. 

25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2018 या कालावधीत वडील ज्ञानेश्‍वर आणि सावत्र आई अश्‍विनी या दोघांनी नूपुर आणि शिवम या दोघांना फरशी पुसण्याच्या दांडक्‍याने आणि पाण्याच्या नळीने बेदम मारहाण केली. याबाबत नूपुर हिने आपल्या आईचे वडील भिवसन आणि मामाला सांगितले. मात्र थोडे मारलं तरी मुले जादा मारल्याचे सांगत असतील असा समज झाल्याने त्यांनी त्या दोघांची समजूत फोनवरून काढली. मात्र त्या दोघांच्या मारहाणीत दिवसेंदिवस भरच पडत होती. आपल्याला किती मारहाण होते हे दाखविण्यासाठी नूपुर हिने आपल्या सावत्र आईच्या मोबाईलवरून मारहाणीच्या वळाचे फोटो काढून आजोबा आणि मामाला गुपचूप पाठविले. त्यानंतर आजोबांनी कासारवाडी येथे धाव घेऊन मुलांसह भोसरी पोलिस ठाणे गाठले. याबाबत अधिक तपास भोसरी पोलिस करीत आहेत. 

Web Title: Pimpri: children torchered by step mother

टॅग्स