पिंपरी-चिंचवड : भाजपची उद्या महापालिकेत सत्त्वपरीक्षा

स्थायी समिती अध्यक्षांना लाच घेतल्याप्रकरणी पोलिस कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी होतेय सभा; विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आक्रमक
PCMC
PCMCSakal

पिंपरी : महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोन वाजता आहे. मात्र, बुधवारी (ता. १८) ठेकेदाराकडून लाच स्विकारल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष व त्यांच्या स्वीय सहायकासह पाच जणांना अटक झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना आक्रमक झाले आहेत. लाच प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी महापालिका प्रवेशद्वारावर व सर्वसाधारण सभागृहासमोर ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. शिवाय, सभागृहातही ते लाच प्रकणावरूनच सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप सर्वसाधारण सभेबाबत काय भूमिका घेणार?, सभा होणार की काही तरी निमित्त करून तहकूब करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक प्रकारे भाजपसाठी शुक्रवार सत्त्वपरीक्षेचा ठरणार आहे.

PCMC
घरकूलच्या नावाखाली फसवणुक; आरोपी अटकेत

दरम्यान, ठेकेदाराकडून एक लाख १८ हजार रुपयांची लाच स्विकारताना पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकासह चार जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १८) सापळा लावून रंगेहाथ पकडले. त्यांच्यासह अध्यक्षांना अटक केली. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचा स्वीय सहायक व मुख्य लिपिक ज्ञानेश्‍वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयंतराव शिंदे आणि शिपाई अरविंद भीमराव कांबळे अशी अटक केलेल्याची नावे आहेत. जाहिरात फलक उभारणी ठेकेदार तरुणाने तक्रार केली आहे.

PCMC
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी १८७ नवीन रुग्ण

महापालिकेच्या जागेत होर्डिंग्ज उभारणीसाठी ठेकेदाराने २८ निविदा भरल्या होत्या. त्या मंजूर आहेत. त्यांची वर्क ऑर्डर न निघाल्याने ठेकेदार हे लांडगे व पिंगळे यांना भेटले होते. त्यांनी वर्क ऑर्डर मिळवणे व करारनाम्यावर सही करण्यासाठी निविदा बोली रकमेच्या तीन टक्के रक्कम दहा लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दोन टक्के रक्कम सहा लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यातील सहा करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्यासाठी दोन टक्के प्रमाणे एक लाख १८ हजार रुपयांची मागणी केली. ती चावरिया, शिंदे व कांबळे यांच्या मार्फत स्विकारल्यावर त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे १३ ऑगस्टपासून पडताळणी सुरू होती. त्यानुसार बुधवारी सापळा लावून कारवाई करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com