पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांच्या बदलीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

महापालिकेचे निष्क्रिय आयुक्त श्रावण हर्डीकर यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पिंपरी - महापालिकेचे निष्क्रिय आयुक्त श्रावण हर्डीकर यांची त्वरित बदली करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

निवेदनात म्हटले आहे, की आयुक्तांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय राहिली. संशयास्पद व वादग्रस्त कचरा निविदाप्रक्रिया, स्वच्छ भारत सर्व्हेक्षणात महापालिकेची घसरण झाली. २४ तास पाणीपुरवठा योजना फसली. वारंवार पाणीकपातीचे धोरण, ठेकेदारांना मुदतवाढ दिली आहे. ३१ मार्च २०१७ च्या अगोदरच्या ठेकेदारांच्या बिलाबाबत योग्य वेळी निर्णय घेतला नाही. 

वायसीएम, वैद्यकीय सेवेचा बोजवारा, विविध विभागातील वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना अभय, हॉकर्स झोन धोरण अंमलबजावणीत अपयश, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना दुजाभावाची वागणूक दिली. त्यामुळे भविष्यात विकसित शहर म्हणून पुढे नेण्यासाठी आयुक्ताची बदली होणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri chinchwad municipal commissioner transfer demand