लढा कोरोनाशी : पिंपरी-चिंचवडमध्ये पालिकेचा मोठा निर्णय; रजा, सुट्या रद्द

PCMC
PCMC

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे व संसर्ग झालेल्या नागरिकांना अधिकाधिक मदत पोचविण्यासाठी महापालिकेत मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच, आपत्कालिन स्थितीत उपाययोजना करण्यासाठी मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ३१ मार्चपर्यंतच्या रजा व सुट्याही रद्द केल्या आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी दिली. 

शहरात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पिंपरीतील वायसीएम व भोसरीतील नवीन रुग्णालयात आयसोलेशन कक्ष सुरू केला आहे, असे सांगून आयुक्त हर्डीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रार्दुभाव रोखणे व संसर्ग झालेल्या नागरिकांना जास्तीत जास्त मदत महापालिकेच्या वतीने पोचवण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत मदत पोचविणेसाठी महापालिका अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक असून, महापालिकेचे सर्व क्षेत्रीय कार्यालये, सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी कामावर असणे गरजेचे आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत वैद्यकीय वगळून सर्व प्रकारच्या रजा संबंधित विभागप्रमुखांनी मंजूर करू नयेत. जे अधिकारी-कर्मचारी रजेवर गेले आहेत. त्यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्वरित कार्यालयात रूजू व्हायचे आहे. तसेच, सर्वांनी सुटीच्या दिवशीही कार्यालयाच्या परवानगीशिवाय महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये. या बाबतची सर्व कार्यवाही संबंधित विभागप्रमुखांनी करावी व आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com