महापालिकेत 91 नवीन चेहरे, 37 नगरसेवकांना पुन्हा संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पिंपरी - गेल्या पंचवार्षिकमधील 128 पैकी फक्‍त 37 सर्वपक्षीय नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा महापालिकेत पाठविले असून तब्बल 91 नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.

पिंपरी - गेल्या पंचवार्षिकमधील 128 पैकी फक्‍त 37 सर्वपक्षीय नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा महापालिकेत पाठविले असून तब्बल 91 नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.

निवडणुकीत मावळते सत्ताधारी राष्ट्रवादीने उमेदवारी देताना जुन्या-नव्यांचा मेळ घालत 60 टक्‍के नवीन चेहऱ्याला संधी दिली होती. त्यामुळे उमेदवारी नाकारलेल्यांनी इतर पक्षाची वाट धरली. तर काही अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. शहरात भाजपची सुप्त लाट असल्याने "किंग मेकर' नगरसेवकांना लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. मात्र, गेली पाच वर्षे काम केलेले 37 नगरसेवक या लाटेतही तरून नेले. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या गयारामांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला. दरम्यान, पहिल्यांदाच निवडून आलेल्या 91 जणांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती होण्यास बराच कालावधी लागणार आहे.

पुन्हा निवडून आलेले नगरसेवक -
योगेश बहल, मंगला कदम, सीमा सावळे, जयश्री गावडे, अजित गव्हाणे, दत्ता साने, राहुल जाधव, नितीन काळजे, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, ऍड. नितीन लांडगे, गीता मंचरकर, राहुल भोसले, समीर मासुळकर, पौर्णिमा सोनावणे, जावेद शेख, वैशाली काळभोर, राजू मिसाळ, अपर्णा डोके, अश्‍विनी चिंचवडे, डब्बू आसवानी, उषा वाघेरे, सुजाता पालांडे, झामा बारणे, माया बारणे, नीलेश बारणे, संगीता भोंडवे, मोरेश्‍वर भोंडवे, शीतल शिंदे, विनोद नढे, नीता पाडाळे, आरती चोंधे, शत्रुघ्न काटे, शीतल काटे, आशा शेंडगे, रोहित काटे

गेल्या पंचवार्षिकमध्ये नसले, तरी पूर्वी नगरसेवकपद भूषविलेले आणि या वेळी पुन्हा निवडून आलेले नगरसेवक - चंद्रकांत नखाते, उषा ढोरे, संतोष लोंढे, एकनाथ पवार, डॉ. वैशाली घोडेकर, सुमन पवळे, संतोष कोकणे.

Web Title: pimpri chinchwad municipal corporator