पिंपरी-चिंचवडमधील शाळा केवळ कागदावरच ‘स्मार्ट’

Shravan-Hardikar
Shravan-Hardikar

पिंपरी - ‘स्मार्ट सिटी प्रकल्पां’तर्गत पालिकेच्या तेरा शाळा ‘स्मार्ट’ होणार, अशी गेल्या वर्षी घोषणा केली. प्रत्यक्षात त्यांचे ९० टक्के काम अपूर्ण असून, त्या स्मार्ट होणार का, असा प्रश्‍न आहे. 

या शाळांमध्ये ‘म्युनिसिपल क्‍लासरूम’ची संकल्पना राबविण्याबाबत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसह आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घोषणा केली. तेथे इंग्रजी आणि रोबेटिक प्रयोगशाळा असणार आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच यासाठी चार कोटींवरून ४० कोटी निधीची तरतूद केली आहे. तरी आज १३ पैकी केवळ पिंपळे गुरव ५४ क्रमांक, म्हेत्रेवस्ती-चिखली आणि तळवडे शाळा या तीन शाळांचे काम पूर्ण झाले आहे. 

उर्वरित शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी आवश्‍यक असलेले संगणक, मोबाईल, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, प्रोजेक्‍टर, इंटरॅक्‍टिव बोर्ड आदी सर्व इलेक्‍ट्रॉनिक साधने कमी-अधिक प्रमाणात बसविली आहेत. काही ठिकाणी नादुरुस्त साधनांची दुरुस्ती सुरू असल्याचे आहे. 
पिंपळे सौदागर माध्यमिक शाळेचे काम प्रगतिपथावर (इन प्रोग्रेस), तर शेवंताबाई जगताप वैदूवस्ती ५८ क्रमांकाची शाळेमधील कामे प्रलंबित असून, काही साधनांची दुरुस्ती केली आहे. 

अद्याप पाच शाळांमध्ये फॅन, आठ शाळांमध्ये रंगीत क्‍लासरूम बनविले नाही. स्लाइडिंग 
खिडक्‍यांचे काम बाकी असून, संगणक लॅब अर्धवट आहे. मोहननगरमधील खिंवसरा तर निगडीतील मधुकर पवळे शाळेत सगळीच कामे ‘पेंडिग’ असल्याचा अहवाल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com