‘स्थायी’त मंजुरीचा नुसता सपाटा

Standing-Committee-Sanction Work
Standing-Committee-Sanction Work

पिंपरी - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती सभेने विविध विकासकामांच्या विषयांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या बारा दिवसांत दोन नियमित व तीन विशेष सभा घेऊन कोट्यवधींच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यात सोमवारी (ता. १६) झालेल्या विशेष सभेत तब्बल २२१ कोटींच्या ६५ विषयांना मंजुरी देण्याचा विक्रम केला.

स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अवलोकनाचा एक (सहा लाख ८४ हजार रुपये), मान्यतेसाठीचे ६१ (६२ कोटी ७१ लाख ४२ हजार रुपये) आणि तरतूद वर्गीकरणाचे तीन (१५८ कोटी २७ लाख ७२ हजार रुपये) असे ६५ विषय मंजूर झाले. त्यात प्रभाग दोनमधील जाधववाडी-कुदळवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २४ कोटी १४ लाख रुपये रकमेचा विषय होता. महापालिकेची नेहरूनगर येथील शाळेची इमारत पाडून नवीन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आठ कोटी आठ लाख आणि चिंचवडच्या तालेरा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या साफसफाईसाठी एक कोटी ८८ लाख रुपये मंजूर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com