पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा उद्या अर्थसंकल्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

पिंपरी - महानगरपालिकेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प मंगळवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता विशेष स्थायी समिती सभेच्या मंजुरीसाठी ठेवला आहे. यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी आला आहे. 

महानगरपालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी ३१ मार्चपूर्वी सर्वसाधारण संमत केला जातो. मात्र यंदा महापालिका निवडणुकांमुळे अर्थसंकल्प मंजुरीला विलंब झाला आहे. ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर व्हावा, या उद्देशाने आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मार्च महिन्यात सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी हा अर्थसंकल्प पाठविला होता. तथापि, ३१ मार्चला स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाली. त्यामुळे हा अर्थसंकल्प प्रथम स्थायी समितीत मंजूर करून त्यानंतरच सर्वसाधारण सभेत आणावा, अशी सूचना महापौर नितीन काळजे यांनी केली होती. तर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी मंगळवारी हा अर्थसंकल्प सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता हा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आयुक्तांनी ठेवला आहे.

Web Title: pimpri-chinchwad municipal tomorrow budget