पिंपरी-चिंचवड विरोधी पक्षनेतेपदावर गुरुवारी शिक्कामोर्तब

pcmc
pcmc

पिंपरी - विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी कार्यकाल संपल्यामुळे पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आगामी विरोधी पक्षनेता कोण होणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्कंठा शिगेला पोचली आहे. गुरुवारी (ता. १८) त्यावर शिक्‍कामोर्तब होणार आहे.

जास्तीत जास्त जणांना संधी मिळावी, यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे पहिल्या वर्षी माजी महापौर योगेश बहल यांना संधी मिळाली. मात्र, त्यांनी अपेक्षितपणे भाजपच्या कारभाराला विरोध केला नाही. त्यानंतर दत्ता साने यांना पक्षाने संधी दिली. त्यांनी सभागृहात आणि बाहेर आक्रमकपणे चुकीच्या कामांना विरोध करत आपली छाप पाडली. मात्र, अभ्यासपूर्ण विरोध करण्यात ते कमी पडले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या पक्षनेत्याची राष्ट्रवादीला गरज आहे. साने यांनी पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी सूचना अजित पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना केली होती. 

त्यामुळे या पदासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, आगामी विधानसभेच्या दृष्टीने इच्छुकांना दोन महिने थांबावे, असे आवाहन साने यांनी केले. त्यावरून इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली.

राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, मयूर कलाटे, नाना काटे आणि जावेद शेख हे इच्छुक आहेत. यापैकी बहुतांश जणांनी अजित पवार यांची भेट घेऊन 
आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. गुरुवारी राष्ट्रवादीची शहरात बैठक होणार आहे. त्यात विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचे, हे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com