पिंपरी-चिंचवड शहरात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

आयुक्त पद्मनाभन यांच्या योजनांना योग्य स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जालना जिल्ह्यात राबविलेल्या योजना शहरात राबविणार आहे. शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी स्ट्रीट क्राइम रोखणे हे प्रमुख उदिष्ट असणार आहे. 
- रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त

पिंपरी - राज्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी आदेश काढला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तर, पाच निरीक्षक, दहा सहायक निरीक्षक व चार उपनिरीक्षक पिंपरी-चिंचवडमध्ये बदलीवर आले आहेत.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून बदली झालेले अधिकारी -
पोलिस निरीक्षक - नवनाथ घोगरे (कोल्हापूर), नितीन जाधव (खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र)

सहायक निरीक्षक - सुप्रिया भोईटे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा) 
उपनिरीक्षक : संभाजी पाटील (अमरावती शहर), सचिन राऊळ (औरंगाबाद परिक्षेत्र) 

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदलीवर आलेले अधिकारी - 
पोलिस निरीक्षक -
 राजकुमार शिंदे (नानविज प्रशिक्षण केंद्र), गणेश जवादवाड (कारागृह विभाग), बाळकृष्ण सावंत (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), शंकर बाबर (मुंबई शहर), सुनील टोणपे (खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र). 

सहायक पोलिस निरीक्षक - विजय गरुड व सिद्धेश्वर कैलासे (विशेष सुरक्षा विभाग), राजू चव्हाण, कृष्णचंद्र शिंदे व विजय बहीर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), अविनाश पवार (मुंबई शहर), स्वाती खेडेकर (मुंबई शहर), सुधीर चव्हाण (नांदेड), विनोद पाटील (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), चंद्रशेखर चौरे (गोंदिया). 

पोलिस उपनिरीक्षक - सचिन शिंदे (ठाणे शहर), यतीन संकपाळ (दहशतवाद विरोधी पथक), रामदास जाधव व अवधूत शिंगारे (गडचिरोली).

रामनाथ पोकळे नवे अपर आयुक्त
पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बुधवारी (ता. २९) अपर आयुक्त मकरंद रानडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर रानडे यांची अमरावती परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून असलेले पोकळे यांची पदोन्नती होऊन ते पिंपरी-चिंचवडला रुजू झाले आहेत. 

पोकळे यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण पोलिस दलात अतिरिक्त अधीक्षक, शहर पोलिस दलात उपायुक्त, सीआयडी पुणे येथे काम केले आहे. त्यानंतर पदोन्नतीवर पोकळे यांनी जालना जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

रानडे म्हणाले, ‘‘अपर पोलिस आयुक्त म्हणून काम करण्याची मला सरकारने संधी दिली. दहा महिन्यांच्या कार्यकाळात आयुक्तालयाची इमारत निश्‍चित करणे, मुख्यालय सुरू करणे, वाहतूक शाखा सुरू करणे यांसह गणेशोत्सव, निवडणूक आणि सणांचा बंदोबस्त हा सहकार्यामुळे यशस्वी करता आला. आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मोकळेपणाने काम करायची संधी दिली.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Police Officer Transfer