पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केला १०१ किलो गांजा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १०१ किलो गांजा भोसरी पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. या गांज्याची किंमत सुमारे १६ लाख रुपये आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १०१ किलो गांजा भोसरी पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. या गांज्याची किंमत सुमारे १६ लाख रुपये आहे.

अतिक युनिस शेख (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर रफिक शेख असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. दोन्ही आरोपी हे मित्र असून ते अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

भोसरी येथील पुणे-नाशिक महामार्गावर हा गांजा इतर व्यक्तींना देण्यासाठी ते आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना त्या अगोदरच अटक केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad police seized 101 kg of Ganja