पिंपरी-चिंचवड : युती मोडण्याचा डाव शिवसेनेने उधळला 

- उत्तम कुटे
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील 90 जागा मागून युती तोडण्याचा भाजपचा डाव शिवसेनेने प्रतिडाव टाकून शुक्रवारी (ता.20) उधळून लावला. सध्या महापालिकेत मित्रपक्षापेक्षा पाचपट संख्याबळ असूनही आगामी निवडणुकीत त्यांच्यापेक्षा तीन जागा कमी घेत तसा प्रस्ताव शिवसेनेने आज दिला. त्यामुळे आपलाच डाव उलटल्याचे पाहून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा संपर्कप्रमुखांशी चर्चा करण्याचे कारण देत चर्चेतून बैठकीतून "वॉकआऊट'केले. दरम्यान, नगरसेवक असलेले शिवसेनेचे "मावळ'चे खासदार यांच्या थेरगाव येथील (प्रभाग क्र. 24) जागेवरही भाजपने दावा केला आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील 90 जागा मागून युती तोडण्याचा भाजपचा डाव शिवसेनेने प्रतिडाव टाकून शुक्रवारी (ता.20) उधळून लावला. सध्या महापालिकेत मित्रपक्षापेक्षा पाचपट संख्याबळ असूनही आगामी निवडणुकीत त्यांच्यापेक्षा तीन जागा कमी घेत तसा प्रस्ताव शिवसेनेने आज दिला. त्यामुळे आपलाच डाव उलटल्याचे पाहून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा संपर्कप्रमुखांशी चर्चा करण्याचे कारण देत चर्चेतून बैठकीतून "वॉकआऊट'केले. दरम्यान, नगरसेवक असलेले शिवसेनेचे "मावळ'चे खासदार यांच्या थेरगाव येथील (प्रभाग क्र. 24) जागेवरही भाजपने दावा केला आहे. थेरगावातील प्रभाग 23 आणि 24 मधील एकेक जागा मागितल्यानेही या युतीच्या चर्चेत खोडा आला आहे.

दोन दिवसांपूर्वी रावेत येथील ताराकिंत हॉटेलात जिल्हा संपर्कप्रमुख गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या युतीच्या चर्चेच्या बैठकीत भाजपने शहरातील 128 पैकी तब्बल 90 जागा मागून फक्त 38 जागा मित्रपक्षासाठी सोडल्या होत्या. तसेच नगरसेवक असलेल्या जागा (उदा.चारुशीला कुटे, श्रीरंग बारणे, शारदा बाबर, राम पात्रे, संगीता भोंडवे)आणि निवडून येणाऱ्या ठिकाणीही भाजपने दावा केल्याने त्यादिवशीची चर्चा निष्फळ ठरली होती.त्यानंतर आज आकुर्डी येथील तारांकित हॉटेलात सायंकाळी पुन्हा ही चर्चा झाली. भाजपचे खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, तर शिवसेनेच्यावतीने शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, बारणे, पिंपरीचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे आदींनी त्यात भाग घेतला.

युती तोडल्याचे बालंट आपल्यावर येऊ नये शिवसेनेने एक पाऊल मागे घेत मित्र होऊ पाहणाऱ्या भाजपला आपल्यापेक्षा (55) तीन जागा अधिक (58) देऊ केल्या. तर महायुतीतील आरपीआयसारख्या मित्रपक्षांसाठी 15 जागा सोडण्याचेही मान्य केले. थेरगावातील दोन प्रभागात मागितलेली एकेक जागा (खासदार बारणे यांचीही) यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील असे सांगत शिवसेनेने युतीत अडसर ठरू पाहणारा हा दुसरा अडथळाही लीलया दूर केला. तसेच मित्रपक्षांनी न लढविलेल्या जागा शिवसेना-भाजपने लढवाव्यात असेही त्यांनी सुचविले. यामुळे युती तोडण्याचे बालंट शिवसेनेवर आणण्याचा डाव फसल्याचे लक्षात येताच भाजपचे पदाधिकारी शिवसेनेच्या या प्रस्तावाने गडबडून गेले. बापट यांच्याशी चर्चा करण्याचे कारण सांगत त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. आता पुढील चर्चा कुठे व कधी होणार हे,मात्र आजच्या घडामोडीमुळे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: pimpri-chinchwad shivsena-bjp alliance