पिंपरी-चिंचवड ‘स्थायी’ची ८१ कोटींच्या कामांना मंजुरी

PCMC
PCMC

पिंपरी - पीएमपीच्या संचलन तुटीपोटी सहा कोटी, फ प्रभागातील जलनिस्सारण कामांसाठी दीड कोटी, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या निधीसाठी दहा कोटी अशा विविध विकासकामांसाठीच्या ८१ कोटी रुपयांच्या खर्चास महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. ११) मंजुरी दिली.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. प्रभाग सहामधील चौक सुशोभीकरण : ३६ लाख, वायसीएम रुग्णालयातील संगणकाकरिता २५० नग मायक्रोसॉफ्ट लायसन्स खरेदी : ५१ लाख, प्रजिमा-३१ थेरगाव रस्त्याचे डांबरीकरण : ९१ लाख, महापालिका दवाखाने व रुग्णालयातील कपडे धुलाई : दोन कोटी १० लाख, किवळे व मामुर्डी येथील नाल्यांची कामे : ५५ लाख, पाणी नमुने तपासणी : २८ लाख, प्रभाग २० मधील पदपथ : २८ लाख, प्रभाग नऊमधील नाल्यांचे सुशोभीकरण : ६७ लाख, एमआयडीसीकडील रावेत येथील जागा १२ मीटर रुंद रस्त्याचा मोबदला : सात कोटी १९ लाख, दिघीतील पाणी टाकीच्या जागेत स्थापत्यविषयक कामे : २७ लाख, शहरातील मुख्य रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई : एक कोटी पाच लाख, प्रभाग १८ मधील स्थापत्यविषयक कामे : ३० लाख, प्रभाग नऊमधील स्मशानभूमी सुशोभीकरण : ७२ लाख, दापोडी क्रीडांगण विकसित करणे - २५ लाख, रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र : दोन कोटी २० लाख, थेरगाव परिसरातील पाणीपुरवठा : ३२ लाख, वायसीएममध्ये भूलशास्त्र विभागासाठी उपकरण खरेदी : दोन कोटी ४९ लाख, प्रभाग २३ मधील रस्त्यांवर दिवाबत्ती व्यवस्था : २५ लाख रुपये आदी कामांना मंजुरी दिली. 

सांडपाण्यासाठी निधी
प्रभाग १९ - २७ लाख, तुळजाईवस्ती- विवेकनगर : ३२ लाख, आनंदनगर- दळवीनगर- विजयनगर : ३३ लाख, काळभोरनगर- मोहननगर : ३२ लाख, मोशी : ४४ लाख, कुदळवाडी- चिखली : ५५ लाख, प्रभाग दोन : ५९ लाख, क प्रभागांतर्गत नदी- नाल्यांमधील मलनिस्सारण नलिकास्थलांतरण : ४५ लाख, पिंपळे गुरव : ३८ लाख, कासारवाडी : ४५ लाख, जाधववाडी : ४४ लाख, महात्मा फुलेनगर : ४४ लाख, चिखली गावठाण : एक कोटी ८० लाख, प्रभाग चार : ५७ लाख, प्राधिकरण सेक्‍टर सात, १०, २३ ते २८ : ९४ लाख, लक्ष्मीनगर- आदर्शनगर- गंधर्वनगरी : २९ लाख, दिघी- विजयनगर- आदर्शनगर : ९० लाख रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com