Video:जुन्या सांगवीतून धावणार तेजस्विनी बस; पाहा कोणते आहेत मार्ग?

pimpri chinchwad tejaswini bus starts from sangvi for women
pimpri chinchwad tejaswini bus starts from sangvi for women

जुनी सांगवी : जुनी सांगवीतून पिंपरी-पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएल 'तेजस्विनी' महिला स्पेशल बससह चार नवीन बस सुरू करण्यात आल्या असून, शहराच्या विविध भागात धावणार आहेत. आज सकाळी १०:३० वाजता आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते या बसचे झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. या वेळी स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, शिवलिंग किनगे, जवाहर ढोरे, आदिती निकम, दिलिप तनपुरे, राणी ढोरे यांच्यासह सांगवीकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चार बस-'सांगवी वर्तूळ सांगवी', 'आळंदी पिंपळे गुरव-फुगेवाडी नाशिक फाटा मार्गे आळंदी सांगवी', 'चांदखेड, 'सांगवी -मारूंजी-डांगे चौक हिंजवडी फेज १ मारूंजी' या मार्गावरून सुरू करण्यात आल्या आहेत. गेली अनेक वर्षांपासून शहराच्या काही भागात येथून थेट बससेवा नव्हती सांगवीकरांची अनेक वर्षांपासून येथून थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी होती. वासी नागरिकांना याआधी ठिकाणी जाण्यासाठी दापोडी अथवा सांगवी फाटा येथे जावे लागायचे.

बसमार्गातही बदल
सद्यस्थितीत आजवर वसंतदादा पाटील पुतळा बसस्थानकाहून गजानन महाराज मंदीर, शितोळेनगर या मध्यवर्ती मार्गावरून बससेवा सुरू होती. मात्र, आता सांगवी वर्तुळ ममतानगर, दत्त आश्रम, मार्गे अय्यप्पा स्वामी मंदीर मुळानगर नदीकिनारा रस्ता मार्गे शितोळेनगर या भागातून बससेवा सुरू करण्यात आल्याने याआधी मैलभर चालत येणा-या ज्येष्ठ नागरीक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी यांची पायपीट थांबून दिलासा मिळणार आहे.

महापौरांनी मारला फेरफटका
महापौर उषा ढोरे यांनी महिला नागरीकांसह सांगवीतील नवीन बसमार्गावरून फेरफटका मारला. ठिकठिकाणी नागरिकांनी बसचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.महापौरांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. अय्यप्पा स्वामी मंदिर समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करून मंदिरासमोर थांब्याच्या विनंती केली. चालक संतोष मोहिते, वाहक साधना साखरे यांनी बसचे सारथ्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com