प्रदूषणमुक्तीकडे पिंपरी शहराची वाटचाल 

सुधीर साबळे
गुरुवार, 28 जून 2018

पिंपरी - प्रदूषणामुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका कमी व्हावा, म्हणून केंद्र सरकारने शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्‍ट्रिक बसचा वापर करण्याचे ठरवले आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील रस्त्यांवर या बस चालविण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक प्रशिक्षण संस्थेला (सीआयआरटी) देण्यात आले आहेत. हा अहवाल तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे सीआयआरटीचे संचालक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सातत्याने वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील प्रदूषणाची पातळी वाढत आहे. त्यावर इलेक्‍ट्रिक बसचा सर्वोत्तम पर्याय आहे. राज्यातील काही शहरांमध्ये इलेक्‍ट्रिक बसचा वापर लवकरच सुरू होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या बस उपयुक्‍त ठरणार असल्याचेही डॉ. सनेर पाटील यांनी नमूद केले. 

त्यांनी सांगितले, की पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी इलेक्‍ट्रिक बसचे मॉडेल कसे हवे, त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा असाव्यात, शहरात या बस चालविताना त्यांचे बिझनेस मॉडेल कसे असावे, याबाबतची माहिती या अहवालात देण्यात येणार आहे. बाहेरच्या देशांमध्ये इलेक्‍ट्रिक बससाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते, या पर्यायांचा विचार, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजना याचा समावेशही त्यात करण्यात येणार आहे. बसमध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे सुरक्षा नियमांनुसारच हा अहवाल तयार करण्यात येणार आहे. 

सध्या हिमाचल प्रदेशात प्रायोगिक तत्त्वावर इलेक्‍ट्रिक बस सुरू आहेत. याखेरीज बेंगळूर, इंदूर, कोलकता, मुंबईमधील रस्त्यांवर त्या धावणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुरवातीला 100 इलेक्‍ट्रिक बसचे नियोजन आहे, अशीही माहिती डॉ. राजेंद्र सनेर पाटील यांनी दिली. 

""सध्या इलेक्‍ट्रिक बसचा पर्याय शहरांसाठी उपयुक्‍त आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविताना 200 किलोमीटर रेंज असलेली बस उपयुक्‍त ठरू शकते. त्यानुसार प्रकल्प अहवालाचे काम करण्यात येत आहे. 
- समीर सत्तीगेरी, प्रकल्प संचालक, सीआयआरटी 

* उपलब्ध इलेक्‍ट्रिक बस 
9 आणि 12 मीटरमध्ये 
* एका बसची किंमत 
1.60 ते 2 कोटी रुपये 
* बॅटरीवर होणारा खर्च 
60 टक्‍के 
* बॅटरीचे लाइफ 
6 वर्षे 

Web Title: Pimpri-Chinchwad will move towards Freedom of pollution