अग्निशमन दलाची 'सेवानिवृत्ती' कडे वाटचाल; नवीन कर्मचाऱ्यांची गरज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पिंपरी : शहर परिसरातील नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीच्यावेळेस तत्काळ धावून जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ 125 कर्मचारी असून त्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मदतकार्यामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे बहुसंख्य 'जवान' आता वृद्धापकाळाकडे झुकू लागले आहेत. बऱ्याच वर्षांपासून दलामध्ये नवीन कायमस्वरुपी भरती न झाल्यामुळे आणखी 325 प्रशिक्षित नवजवानांची गरज विभागाला भासत आहे. 

पिंपरी : शहर परिसरातील नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीच्यावेळेस तत्काळ धावून जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ 125 कर्मचारी असून त्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मदतकार्यामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे बहुसंख्य 'जवान' आता वृद्धापकाळाकडे झुकू लागले आहेत. बऱ्याच वर्षांपासून दलामध्ये नवीन कायमस्वरुपी भरती न झाल्यामुळे आणखी 325 प्रशिक्षित नवजवानांची गरज विभागाला भासत आहे. 

पुणे : टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत जखमी झालेल्या विद्यार्थीनीचा मृत्यू 

संत तुकारामनगर येथील कै.जनरल अरुणकुमार वैद्य हे पालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य केंद्र आहे. तेथून शहरातील अग्निशमन वाहने-उपकरणे, कर्मचारी यांचे व्यवस्थापन करणे, त्यांना आवश्‍यक प्रशिक्षण देणे, सर्व प्रकारचे अग्निशमन आणि आपत्कालीन वर्दीचे कामकाज हाताळण्याची जबाबदारी पार पाडली जाते. सध्या रहाटणी, प्राधिकरण, भोसरी, चिखली, तळवडे येथे उपकेंद्रे कार्यरत आहेत. 

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहराचे झपाट्याने नागरीकरण होऊन लोकसंख्याही वाढली आहे. नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीचे स्वरुप काळानुरुप बदलत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून अग्निशमक दल अजून मूलभूत गरजा व सुविधांसाठी झगडत आहे. सध्या दलाकडे कागदोपत्री 135 जवान, लिपिक, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी असे मनुष्यबळ आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी केवळ 125 जवान, कर्मचारी-अधिकारी, लिपिक कामकाज करत आहेत. सध्या 85 फायरमन, 12 तांडेल, 6 सब-ऑफिसर्स तसेच 22 वाहनचालक आहेत. प्रत्यक्ष मदतकार्यासाठी 40 वर्षांच्या आतील जवान असणे गरजेचे आहे. मात्र, या सर्व कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 45 वर्षांच्या आसपास असून वाढत्या वयोमानामुळे त्यांच्या कामकाजाला मर्यादा येऊ लागल्या आहेत. बरेच कर्मचारी सेवानिवृत्तीकडे झुकू लागले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

सुपरवायझर म्हणून 50 वर्षे आणि तत्काळ निर्णय घेण्यासाठी सर्वात अनुभवी अधिकाऱ्यांचे वय साधारणतः 50 वर्षांपुढील असायला हवे. प्रत्येक पाळीला 10 ते 12 कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात गरज असताना केवळ 2 ते 4 कर्मचारीच उपलब्ध राहत आहेत. विभागातील 70 ते 80 टक्के जुनी पदे रिक्त आहेत. त्यामुळे, प्रत्येक पाळीतील कर्मचाऱ्याला पुढील पाळीत देखील काम करावे लागत आहे. 

हिंजवडी : टीसीएस कंपनीच्या आवारातच इंजिनिअरने केली आत्महत्या

फुगेवाडी दुर्घटनेच्यावेळेस बाहेरुन जेसीबी मागविला.. 
अग्निशामक दलाकडे जुना जेसीबी आहे. त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे, नवीन एकेक जेसीबी, क्रेन आणि रिकव्हरी व्हॅन खरेदी केली जाणार आहे. फुगेवाडी दुर्घटनेच्यावेळेस जेसीबी उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना तो बाहेरून मागवावा लागला होता. 

पिंपरीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट;13 वर्षीय चिमुकल्यासह तीन जण जखमी 

इतक्‍या नवीन मनुष्यबळाची गरज... 
फायरमन - 165 
तांडेल - 30 
सब-ऑफिसर - 25 
वाहन चालक - 60 

 Video : पबजीमुळे अजित पवारला लागलं वेड!

"अग्निशामक दलामध्ये 1985 पासून कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध (स्टाफिंग पॅटर्न) लागू नाही. नवीन युवा कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी भरती होणे हीच मुख्य गरज आहे. उर्वरीत उपाय तात्पुरत्या स्वरुपाचे ठरत आहेत. सध्या आम्हाला एकूण 450 ते 500 कर्मचाऱ्यांची गरज आहे.''
- किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका 

मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Firefighters Need new employees