मोशी कचरा डेपोला मोठी आग; बारा तासानंतरही आग आटोक्यात नाही 

संदीप घिसे
शुक्रवार, 30 मार्च 2018

पिंपरी :  मोशी येथील कचरा डेपोला गुरुवारी (ता.२९) रात्री लागलेली आग बारा तासानंतरही आटोक्यात आलेली नाही.

 मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्याची वर्दी गुरुवारी (ता.२९) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार सुरुवातीला भोसरी येथील अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरूप पाहता आणखी चार बंब घटनास्थळी दाखल झाले. 

रात्रीच्या वेळी अंधार असल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. याशिवाय घटनास्थळी जाण्यासाठी केवळ एकच अरुंद रस्ता असल्याने अडचण येत आहे.

येथे टाकण्यात आलेल्या कचऱ्यात निम्म्याहून अधिक प्लास्टिक अाहे. याशिवाय मोकळ्या मैदानातील हवेमुळे कचरा अधिक जोराने पेट घेत आहे. आग विझविण्याकरता पाणी अपुरे पडत असल्याने अग्निशामक दलाने दहा खासगी टँकरचीही मदत घेतली आहे.

वाऱ्याचा जोर पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने मोशी, डुडुळगाव, चोवीसावाडी, चऱ्होली या आसपासच्या गावांमध्ये धूर पसरला आहे. येथील नागरिकांना धुराचा अधिक त्रास झाल्यास त्यांना स्थलांतरही करावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महापौर नितीन काळजे, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, आदींनी घटनास्थळी भेट देऊन आग विझवण्याबाबत सूचना केल्या.

Web Title: pimpri moshi dumping ground fire