लाच स्विकारताना पिंपरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यास अटक 

संदीप घिसे 
सोमवार, 26 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : पत्नीच्या नावे सदनिका करून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्विकारणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी वाघेरे क्षत्रीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही घटना सोमवारी (ता.26) दुपारी घडली. 

अमोल चंद्रकांत वाघिरे (वय 38) असे अटक केलेल्या कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील सदनिका पत्नीच्या नावे करण्यासाठी तक्रारदाराने पिंपरी वाघेरे येथील करसंकलन विभागाकडे अर्ज केला होता. त्यावेळी आरोपी अमोल वाघेरे याने फिर्यादी यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे त्या नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी दुपारी दोन हजारांची लाच घेताना आरोपी अमोल वाघेरे याला अटक केली. सायंकाळी उशिरापर्यंत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पिंपरी चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 2017 मध्ये पाचवेळा कारवाई केली. त्यामध्ये लाच घेताना शिक्षण विभाग, आरोग्य विभागासह आयुक्‍तांच्या स्वीय सहायकालाही अटक केली आहे. मात्र 2018 मध्ये महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

Web Title: Pimpri municipal employee arrested for accepting a bribe